Tuesday, October 1, 2019

स्वप्नातला वालपराय

पश्चिम घाटातल्या निलगिरी पर्वतरांगेच्या कुशीत वसलेले चहाचे मळे.आकाशाला कवेत घेऊ पाहणार्‍या उंचच उंच गर्द असं मदुमलाईच गूढ जंगल.जंगलांमधून नागिणीसारखा सरसर धावणारा काळाभोर रस्ता व त्याला कुठतरी मधेच फुटणाऱ्या अशक्य उताराच्या आडवाटा. ह्या रहस्यमय जंगलाची कधी भीती वाटते तर कधी ते आपल्या विशाल अंतःकरणाचा खजिना उघडून आपल्याला हरवून,मोहून टाकते.क्षणा क्षणाला जिथे बघावं तिथे फ्रेम दिसत असतात.मध्येच एखादी लख्ख उन्हात चमकणारी प्रचंड दरी लागते व आपल्याला जणू काय पूर्ण कवेत घेते तर थोड्या पुढे वृक्षांच्या घनदाट जंगलामुळे प्रकाशाच एखाद किरण सोडलं तर बाकी गडद काळोखात आपण प्रवेश करतो.हि फ्रेम कैद करू की ती अश्या द्विधा मनस्थितीत आपण राहतो व कॅमेरा तसाच वाट बघत मांडीवर पडून असतो. ४० हेअरपिन बेन्ड्स म्हणजे भरीव वळणाचे प्रकार आपण ओलांडतो.सकाळच्या सोनेरी उन्हात मस्त डवरलेल्या व ओळीने कापलेलया चहा-कॉफीच्या मळ्यामधून रस्ता कापत गाडी हळूच एक एक वळण घेत उंच डोंगरावर विसावलेल्या एका विशाल ब्रिटिश कालीन बंगल्यासमोर येऊन थांबते.सगळ्या बाजूंनी दाट जंगल व मधे छोट्या छोट्या टेकड्यावरती पसरलेले चहा-कॉफीचे मळे नजर जाईस्तव समोर दिसत असतात. आपण कॅमेरा घेऊन समोरचा नजारा फ्रेम करायचा व्यर्थ उद्योग करत असतो.तोच आपल्या बाजूला कोणतरी व्यक्ती उभी असल्याची जाणीव होऊन आपण कॅमेरातून डोके बाहेर काढतो.पारंपारिक तामिळी पोशाख परिधान केलेला तो गृहस्थ मोठ्या अदबीने एक थंड प्याला आपल्या हातात देतो.....    
   

No comments: