पहाटेचे स्वप्न :
बाळ अरे बाळ कधी रे येत आहेस भेटायला ?
बरेच दिवस झाले की रे भेटून.
संसाराच्या धावपळीत बुडून गेलास की रे पार.
चल परत एकदा भेटूया.
उघड्या आकाशाखाली,चांदण्या रात्री मनमुराद गप्पा मारुया.
खूप खूप बोलावयाचे आहे.
तू येशील,खात्री आहेच मला !!!!
गूरु रतनगड प्रेमाने साद घालतायेत.
सकाळची स्वप्ने खरी ठरतात अस म्हणतात …